राज्य सरकार आता एक लाख ४५ हजार पद भरती तयारीत आहे. त्यामुळे सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे या अगोदर सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार पदांची पदभरती करण्याचा निर्णय घेतलेला होता. 75 हजार पदांची पदभरती ऑगस्ट 2023 पर्यंत करण्याचा संकल्प देखील सरकारने केलेला आहे. लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील पदभरती या प्रायव्हेट कंपन्या करणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे आयबीपीएस व दुसरी टीसीएस होय एकीकडे कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीला सरकार चालना देत असतानाच एक लाख 45 000 पदभरतीचा केवळ आभास तर निर्माण करत नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे .या अगोदर केलेल्या सरकारी पदभरती मध्ये 6499 पदांची भरती करण्यात आलेली आहे व दहा हजार पदांची पदभरती प्रक्रिया चालू आहे एकीकडे सरकारी खर्चामध्ये वाढ होत आहे. असे सरकार दर्शवते व पदभरतीचे मात्रा आश्वासन देते यामुळे विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर गोंधळून गेलेला आहे .या अगोदर तलाठी महसूल विभागातील पद आरोग्य विभागातील पद त्याचबरोबर विविध विभागातील पदभरती रिक्त असतानाच सरकार नवीन नवीन घोषणा करत आहे .यावरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी काय समजायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर मात्र आहे या अगोदर नियुक्त केलेल्या टीसीएस व आयबीपीएस कंपनीकडून 47 हजार पदांची पदभरती करण्यासाठी सरकारने करार देखील केलेला आहे आता हे पाहणे महत्त्वाचे आहे .की सरकार ही पद भरती केव्हा करेल. दिवसेंदिवस सरकार देत असलेली आश्वासने त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे वाढते वय होणारा मानसिक त्रास याकडे सरकार पाहणार की फक्त घोषणाच करणार या अगोदर देखील सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या पण अंमलबजावणी लाख खूप वेळ लागतो त्यामुळे विद्यार्थी हाताश होतोय त्यामुळे राज्य सरकारला विद्यार्थ्यांचा आग्रह राहील त्यांनी भरती प्रक्रिया लवकरात पार पाडावी
Tags
Naukari. Gov. Job
